कार्यकर्तृत्वास सलाम 🙏
कार्य कर्तुत्वाला सलाम🙏🏻
कर्तृत्ववान अधिकारी सचिन ढोले साहेब यांना मनाचा मुजरा 👍
"प्रशासकीय अधिकारी" म्हटले की नजरे समोर काही वेगळीच चित्रं सर्व सामान्य माणसाच्या डोळ्यासमोर उभी राहतात. त्यामध्येच त्याच्या कार्यभार स्वीकृती नंतर शहरात नाव चर्चेत राहण्यासाठी काही प्रयत्न होतात काही निर्बंध लादले जातात.ठराविक लोकांना सावध करणे (आपलेसे करणे) असेआरंभी शूर होऊन परत त्या पदावर अधिकारी आहे की नाही हेच सर्व सामान्य व्यक्तीला कळत नाही हीच प्रतिमा प्रशासकीय अधिकारी म्हणून सर्व सामान्य व्यक्तीस जाणवते.
या वरील सर्व गोष्टींना अपवाद ठरलेली कारकीर्द पाहण्याचा योग्य आम्हा पंढरपुरामधील नवीन पिढीच्या नशिबात 2 वेळा आला एक सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून तुकाराम मुंढे साहेब याच प्रकारे धाडसी पण आपल्या स्वभावगुणातून प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीला समरस करून कार्यपिपासू व लोकजागर करत कारकीर्द गाजवणारा अधिकारी म्हणून कार्यशैली जाणवली ती प्रांताधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सचिन ढोले साहेब यांची.
सर्व सामन्यातील अति सामान्य व्यक्ती ही सहज या अधिकाऱ्याला भेटू शकत होती. त्यांच्या ऑफिस मध्ये प्रवेश करून चहा पिऊन काम पूर्ण करून येत होती.प्रत्येक सर्व सामान्य व्यक्ती व त्याच्या सूचना विचार हे सर्व सहज पणे यांच्यासमोर मांडू शकत होता.आपल्या कार्यकाळात पंढरपूर तालुक्यासोबतच साक्षात परमात्मा पांडुरंगाची सेवा या व्यक्तीच्या हातून शुभ्र पणे घडली आषाढी यात्रेतील सूक्ष्म नियोजन करणारी ही व्यक्ती वारकरी केंद्रबिंदू मानून त्यांना सेवा पुरविण्यात अग्रेसर असे हे प्रशासनातील उत्कृष्ठ अधिकारी.प्रत्येक संकट काळात जनता व त्यांच्यातील होतकरू तरुण वर्गाला सोबत घेतले त्यांना प्रशासनाचे मित्र बनवून लोकजागृती चळवळ राबिवली. याच प्रकारच्या जन-जागृती मुळे व लोकसहभागातून कोरोना काळात पंढरपूर ला संकटातून लीलया बाहेर काढले. संकट हे कारकीर्द सिद्ध करण्याची ताकद असते हे प्रत्यक्ष आपल्या कार्यातून सिद्ध करणाऱ्या आशा या अवलिया अधिकाऱ्यास सन्माननीय सचिन जी ढोले साहेब यांना पुढील आयुष्यात भरपूर यश संपादन होवो व नवनिर्मित होऊ घातलेल्या पंढरपूर जिल्ह्याचे पहिले जिल्हाधिकारी म्हणून आपण येवोत हीच रुक्मिणी-पांडुरंग चरणी प्रार्थना.
पुनरागमनायचं ढोले साहेब 🙏🏻
Comments
Post a Comment