सहकार भारती च्या इतिहासातील पहिला पद्ग्रहन समारंभ ..
सहकार भारती बार्शी शाखेचा नवनियुक्त तालुका समिती पदाधिकारी बांधवांचा पद्ग्रहन सोहळा मातृमंदिर , ढगे मळा बार्शी येथे मंगळवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी पार पडला. डिजिटल मीडिया पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष श्री राजा माने या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी संत अभ्यासाचे गाढे अभ्यासक डॉ.प्रा.सचिनजी लादे सर यांनी नवीन जबाबदारी स्वीकारणारे पदाधिकारी व उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. सहकार भारतीचे संस्थापक लक्ष्मणराव इनामदार यांच्या मनातील संकल्पना व उभी राहिलेली संस्था याबाबत माहिती देत कार्यप्रणाली ही समजून सांगितली. संघटनेचा पदाधिकारी कसा असावा त्याची विचारसरणी कशी असावी याबाबत विवेचन करताना प्रा.डॉ. सचिनजी लादे सर यांनी सप्तसूत्री सांगितले ही सप्तसूत्री सांगत असताना संघटनेत काम करणाऱ्या जेष्ठ लोकांचे कार्यातून उभी केलेली उदाहरणे देखील त्यांनी सांगितली. सप्तसूत्री आत्मसात करताना संघटनेवर श्रद्धा असावी , कार्यप्रणालीवर विश्वास व अढळ निष्ठा असावी , आपले काम प्रामाणिक पणाने करीत समर्पणाची भावना मनामध्ये असावी , कारभार पारदर्शक असावा व प्रत्येक पदाधिकार्यांचा वावर हा मुक्त असावा म्हणजेच स्वभाव हा मनमोकळा असावा याबाबत मार्गदर्शन करीत तब्बल 1 तास आपला वक्तृत्व शैलीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले .
यानंतर सर्व नूतन समिती सदस्यांनी पद्ग्रहन सोहळा उत्साहात पार पडला याप्रसंगी सर्व उपस्थितांनी हा पद्ग्रहन म्हणजे जबाबदारीची स्वीकृती आहे समजून सहकार भारतीचे कार्य वाढविण्याचा निर्धार केला.
सहकार भारती बार्शी शाखेच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले व कार्यक्रमाची सांगता चहापान कार्यक्रमाने करण्यात आली .
©दिपस्तंभ
Comments
Post a Comment