जिजाई बालक मंदिर येथे बाजार दिवसाचे आयोजन
*बाल-गोपाळ झाले व्यापारी*
वय वर्षे अवघे अडीच ते साडेतीन मधील लहान मुलांच्या सौ जोशी मॅडम यांच्या बालक मंदिरा मध्ये आज मुलांना व्यावहारिक ज्ञान प्राप्त व्हावे व पारंपरिक विक्रेते कसे असतात याची माहिती व्हावी या हेतूने बाजार दिवस आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये सर्व बालके उत्साहाने सहभागी झाले.व्यापार व बाजाराच्या वातावरनामध्ये तल्लीन झाले.
या नियोजनामध्ये सर्व पालकांचा उत्साह व आयोजनातील प्रतिसाद हा अतिशय सकारात्मक होता याचेही करावे तेवढे कौतुक थोडे आहे याचे कारण म्हणजे कोणत्याही प्रकारे न ठरवता सर्व पालकांनी आपल्या बालकांना दुकान मांडण्यासाठी विविध गोष्टी च्या युक्ती चा वापर केल्याचे दिसले यामध्ये सकारात्मक ऊर्जा , माहिती देणारे फलक बनविण्यात आले होते.भाजी-पाला ,भेळ , हार-फुले विक्रेता, फळ विक्री , स्टेशनरी , लहनग्यांचे चॉकलेट बिस्कीट चा स्टॉल यामध्ये काही स्टॉल वर डिजिटल इंडिया ला प्रेरणा देणारे QR ही दिसून आले असे जवळ जवळ एका ग्रामीण भागात भरणाऱ्या बाजाराची जणू आठवण व्हावी असा लहानग्यांच्या किलबिलाटाने बाजार दिवस भरून गेला अमूल्य आशा आनंदाचा व्यापार झाला.
सौ .जोशी मॅडम यांचे जिजाई बालक मंदिर मध्ये असे अनेक विविध लहानग्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन वेळो वेळी करण्यात येते यामध्ये दहीहंडी कार्यक्रम ,नागपंचमी चे पारंपरिक खेळ ,गणेशोत्सव मिरवणूक , दीप पूजन ,आशा सर्व स्तरावरील बालकांचा विकास होण्यासाठी उत्तमोत्तम पारंपरिक संस्कृतीशी निगडित कार्यक्रमाचे आयोजन करून सुंदर बालसंस्कार घडविणाऱ्या सौ जोशी बाई यांचे या संकल्पनेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद🙏🏻
सुंदर उपक्रम
ReplyDelete