सहकार भारती , महाराष्ट्र प्रदेश त्रैवार्षिक अधिवेशन शिर्डी
बिना संस्कार, नहीं सहकार ।
बिना सहकार नहीं उद्धार ।।
सहकार भारती , महाराष्ट्र प्रदेश त्रैवार्षिक अधिवेशनास शिर्डी येथे कार्यकर्ता म्हणून उपस्थित राहण्याचा योग बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी *श्री उमेश विरधे साहेब* यांच्यामुळे आला यामध्ये सहकार भारती चे राष्ट्रीय पदाधिकारी श्री उदय जोशी , रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चे संचालक श्री सतीश जी मराठे यांचे विचार ऐकून संघटन कसे असावे संघटनेचे कार्य कसे असावे व संघटनेच्या कार्याचा प्रभाव हा संपूर्ण यंत्रणेवर कसा होऊ शकतो याचा लेखा-जोखा व सहकाराचा मूळ गाभा समजला..!
यानंतर च्या सत्रात मीडिया ची वर्तमान परिस्थिती व आवश्यकता यावर news 18 लोकमत चे सहसंपादक मिलिंदजी भागवत व सौ निवेदिता भागवत यांचे मार्गदर्शन मिळाले या मधून असेही समजले की आपल्याला हव्या त्या गोष्टी वर आपण बिनधास्त पणे व्यक्त झाले पाहिजे व आपले विचार लोकांसमोर मांडले पाहिजे यामध्ये आपण मागे पडलो तर अविचारी लोकांचा सुळसुळाट होतो..!
पुढे सनदी लेखापाल श्री प्रकाश जी पाठक यांनी संघटना व कार्यकर्ता याबाबत सविस्तर माहिती दिली कार्यकर्ता कसा असावा संघटनेचे नावलौकिक कसा वाढू शकतो याबाबत सविस्तर माहिती दिली यातून आपण करत असणाऱ्या कामामुळे आपण काम करत असणारी संस्था , संघटना कशी मजबूत होऊ शकते याबाबत मोलाचे मार्गदर्शन लाभले..!
3 वर्षाच्या आपल्या पदाधिकारी म्हणून च्या कार्यकाळात संघटनेचे सदस्य वाढविणे युवकांना सोबत घेणे सहकारात तसेच चळवळीत युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी महामंत्री म्हणून श्री विवेक जुगादे यांनी केलेल्या यशस्वी प्रयत्नांची चुणूक या अधिवेशनात दिसून आली..!
सहकार महर्षी ग्रँथ द्वितीय आवृत्ती प्रकाशन सोहळा व अण्णासाहेब गोडबोले पुरस्कार वितरण सोहळा अत्यन्त दिमाखदार होता राजस्थान चे महामहिम राज्यपाल श्री हरिभाऊ बागडे , नगर चे पालकमंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील , कोपरगाव चे आमदार श्री आशुतोषजी काळे यांचे उपस्थितीत हा पार पडला यावेळी सहकारात काम करण्याची केंद्राची रचना महोदयांनी सांगितली व केंद्रीय स्तरावरून सहकार वाढविण्यासाठी व त्याचा स्वाहाकार होऊ नये यासाठी सुरू असणाऱ्या योजनांची माहिती मिळाली...!
आशा या सोहळ्याचे वर्णन म्हणजे मिळालेला एक अनुभव होता की *सुसंगती सदा घडो सृजन वाक्य कानी पडो* आशा या दिमाखदार व सुनियोजित अधिवेशन कार्यात सहभागी होण्याची तसेच व्यासपीठवर सहकार गीत गायनाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पंढरपूर बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री उमेश विरधे साहेब यांचे मनःपूर्वक धन्यवाद..🙏🏻
आपला
©विशालसिंह तपकीरे
Comments
Post a Comment