सहकार भारती , महाराष्ट्र प्रदेश त्रैवार्षिक अधिवेशन शिर्डी
बिना संस्कार, नहीं सहकार । बिना सहकार नहीं उद्धार ।। सहकार भारती , महाराष्ट्र प्रदेश त्रैवार्षिक अधिवेशनास शिर्डी येथे कार्यकर्ता म्हणून उपस्थित राहण्याचा योग बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी *श्री उमेश विरधे साहेब* यांच्यामुळे आला यामध्ये सहकार भारती चे राष्ट्रीय पदाधिकारी श्री उदय जोशी , रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चे संचालक श्री सतीश जी मराठे यांचे विचार ऐकून संघटन कसे असावे संघटनेचे कार्य कसे असावे व संघटनेच्या कार्याचा प्रभाव हा संपूर्ण यंत्रणेवर कसा होऊ शकतो याचा लेखा-जोखा व सहकाराचा मूळ गाभा समजला..! यानंतर च्या सत्रात मीडिया ची वर्तमान परिस्थिती व आवश्यकता यावर news 18 लोकमत चे सहसंपादक मिलिंदजी भागवत व सौ निवेदिता भागवत यांचे मार्गदर्शन मिळाले या मधून असेही समजले की आपल्याला हव्या त्या गोष्टी वर आपण बिनधास्त पणे व्यक्त झाले पाहिजे व आपले विचार लोकांसमोर मांडले पाहिजे यामध्ये आपण मागे पडलो तर अविचारी लोकांचा सुळसुळाट होतो..! पुढे सनदी लेखापाल श्री प्रकाश जी पाठक यांनी संघटना व कार्यकर्ता याबाबत सविस्तर माहिती दिली कार्यकर्ता कसा असावा संघटनेचे नावलौकिक कसा वाढू शकतो याबाबत ...